मुंबई : पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये घुसून भारताने सर्जिकल स्ट्राइक कारवाई केली. या कारवाईवर आणि उरीत झालेल्या हल्ल्यात काही जवान शहीद झाले. यावर अभिनेते ओम पुरी यांनी अपमानकारक टिपन्नी केली होती. याबाबत आपण मोठी चूक केल्याचे मान्य केले. मी शहीद जवानांच्या कुटुंबीयांची माफी मागतो, असे म्हटले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दहशतवादी हल्यात उरीमध्ये अनेक जवान शहीद झालेत. त्यांच्याबाबत ओम पुरी यांनी वाईट मत व्यक्त केले होते. त्यांनी भारतीय जवानांचा अपमान केला होता. आम्ही सांगितले होते का, सैन्यात भरती व्हायला, असे संतापजनक व्यक्तव्य केले होते. त्यानंतर आज माफी मागितली. मी हुतात्मा झालेल्या जवानांच्या घरी जाऊन त्यांची माफी मागणार आहे. मला शिक्षा करा, असे त्यांना सांगणार आहे, असे त्यांनी म्हटले, 


दरम्यान, पाकिस्तान कलाकारांचे कार्यक्रम देशात नको, अशी भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतली. त्यानंतर पाक कलाकार पाकिस्तानात लपून-छपून गेलेत. तिकडे गेल्यानंतर भारताबद्दल वाईट मत व्यक्त केले. असे असताना आता अभिनेते ओम पुरींना पाकिस्तान कलाकारांचा पुळका आला होता.


पाकिस्तानी कलाकार हे अधिकृत वर्क व्हिसावरच भारतात काम करत आहेत. त्यामुळे अचानक त्यांची हकालपट्टी केल्यानंतर त्यांच्या चित्रपटात कोट्यवधी रुपये गुंतवणाऱ्या भारतीय निर्मात्यांनाच मोठा फटका बसणार आहे, असे ओम पुरी म्हणालेत.


पाकिस्तानी कलाकारांना इथेच राहू देणं किंवा परत पाठवणे यामुळे फारसा काही फरक पडत नाही. मी सहा वेळा पाकला गेलो आहे. त्यांच्याकडून योग्य प्रेम आणि आदर मिळाला आहे, असेही पुरी म्हणालेत.