मुंबई : बिग बॉसच्या घरात दररोज नाती तुटताता आणि बनतात. असंच काहीसं काल बिग बॉसच्या घरात घडलं. कालपर्यंत मुलीसारखं मानणाऱ्या ओम स्वामी यांनी मोनालिसाबाबत इतके धक्कादायक विधान केले ज्याची कोणी अपेक्षाच केली नव्हती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोनालिसा काल 'चढ़ती जवानी मेरी चाल मस्तानी' या गाण्यावर डान्स करत होती. तेव्हा ओम स्वामी तिला पाहत होते. ओम स्वामींनी तिच्याकडे पाहत म्हटले, म्हातारपणात ही जवानी कुठून आली...आणि तोंडावर मेकअप थापल्याने काही माणूस तरुण होत नाही.


ओम स्वामी अशाप्रकारचे विधान करतील याची कोणाला अपेक्षाच नव्हती. तसंच नॉमिनेशनपासून बचाव करण्यासाठी युथला अशाप्रकारे आकर्षित करत आहे. किती घाणेरडी लोक आहेत, असेही ते पुढे म्हणाले.