COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : झी मराठीच्या चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सहभागी झाला होता. यावेळी अभिनेता सागर कारंडे यांने सचिन तेंडुलकरच्या नावे एक पत्र वाचून दाखवलं. 


पत्र वाचताना सचिन तेंडुलकर आनंदी झाला, तर कधी कधी भावूकही, प्रेक्षकांनीही या पत्राला कान लावून ऐकलं. या पत्र लेखक अरविंद जगताप यांनी लिहिलं होतं.


 सागर कारंडेने आपल्या सुरेख शैलीत ते सचिनला वाचून दाखवलं आणि सचिनसह त्याचा परिवार आणि प्रेक्षकांचं मन जिंकलं.