सलमानचा सुल्तानमधील `तो` फोटो रिअल नाही?
दबंग खान सलमानचा सुल्तान हा सिनेमा यंदाच्या वर्षातील बहुप्रतिक्षित सिनेमांपैकी एक आहे. नुकताच या सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाला. सल्लूच्या चाहत्यांनी या टीझरला चांगला प्रतिसादही दिला.
मुंबई : दबंग खान सलमानचा सुल्तान हा सिनेमा यंदाच्या वर्षातील बहुप्रतिक्षित सिनेमांपैकी एक आहे. नुकताच या सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाला. सल्लूच्या चाहत्यांनी या टीझरला चांगला प्रतिसादही दिला.
टीझर शेअर केल्यानंतर सलमानने आपल्या ट्विटरवरुन सुल्तानमधील एक फोटो शेअर केलाय.
मात्र हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच गाजतोय. याचे कारणही तसेच फनी आहे. हा फोटो खरा नसून फोटोशॉप केलेला असल्याची चर्चा सर्वत्र होतेय.