मुंबई : उडता पंजाबपेक्षा सैराट हा चित्रपट उत्तम आहे, असं प्रशस्तीपत्रक सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी दिलं आहेत. उडता पंजाब हा सुमार दर्जाचा चित्रपट आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांनी नाकारलं, त्यामुळे दुसऱ्याच आठवड्यात तो पडला, असं निहलानी म्हणाले आहेत. सैराट हा उत्तम चित्रपट हिट ठरला असंही निहलानी म्हणाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंजाबमधल्या ड्रग्ज प्रश्नावर भाष्य करणाऱ्या अनुराग कश्यपच्या उडता पंजाबच्या रिलीजआधी वाद झाले होते. या चित्रपटातली काही दृष्यं काढून टाकायला सेन्सॉर बोर्डानं सांगितलं होतं, तसंच उडता पंजाबमधलं पंजाब हे नाव काढण्यासही सांगतिलं होतं. अखेर हा वाद कोर्टात गेला आणि कोर्टानं आहे त्या नावातच आणि एका कटसह हा चित्रपट रिलीज करण्याचा आदेश दिला.