मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासू आणि हॅन्डसम हंक करण सिंह ग्रोवर यांच्या लग्नाच्या बातमीवर आता दोघांनीही ऑफिशिअली होकार दिलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

येत्या, ३० एप्रिल रोजी या दोघांचा विवाह पार पडणार आहे. याचं एक व्हिडिओ आमंत्रणही जवळच्या आप्तेष्ठांना पाठवण्यात आलंय. 


एक आनंदाची बातमी सर्वांशी शेअर करायला आम्हाला आनंद होतोय. ३० एप्रिल २०१६ हा आमच्यासाठी खूप मोठा दिवस आहे. कुटुंबिय, मित्रमंडळी, फॅन्स आणि शुभेच्छा देणाऱ्या सगळ्यांना आमच्याकडून प्रेम... असं या दोघांनी म्हटलंय.



करण - बिपाशाचा हा विवाह सोहळा अत्यंत खाजगी पद्धतीनं होणार आहे. आपल्या खाजगी आयुष्याचा सगळ्यांनी मान ठेवावा, अशी विनंतीही त्यांनी सगळ्यांना केलीय. 



सोबतच करणनं आपल्या विवाहाच्या आमंत्रणाचे काही फोटोही शेअर केलेत.