मुंबई : 'बालिकावधू' फेम अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी हिचा बॉयफ्रेंड सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. कोर्टानं त्याचा जामीन अर्ज फेटाळलाय. याच दरम्यान, राहुलच्या पहिल्या लग्नाचे काही फोटो समोर आलेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राहुलचा एक मित्र आसिफ अली यानं मीडियाला दिलेल्या माहितीनुसार, झारखंडमधल्या रांचीमध्ये राहणारी एअर होस्टेस शौगता मुखर्जी हिच्याशी राहुलचं पहिलं अरेंज मॅरेज झालं होतं. परंतु, काही दिवसांनंतर या दोघांचा घटस्फोट झाला.  


राहुल आणि शौगता

राहुल आणि त्याच्या वडिलांनी मात्र राहुलच्या पहिल्या लग्नाच्या बातम्या साफ नाकारल्यात. 


राहुल आणि शौगाता

राहुलच्या अनेक गोष्टींचा प्रत्युषासमोर खुलासा झाला होता. यामध्ये राहुलचे आधीच लग्न झालेलं असल्याची तसेच त्याची एक्स गर्लफ्रेण्ज सलोनी राज बरोबरही त्याचे अजूनही संबंध असल्याची माहिती प्रत्युषाला मिळाली होती, असं तिच्या मित्र-मैत्रिणींचं म्हणणं आहे.