दिल्ली : पिपली लाईव्ह या चित्रपटाचा सहदिग्दर्शक महमूद फारुकीला बलात्कार प्रकरणी दिल्ली कोर्टानं दोषी ठरवलं आहे. भारतीय चित्रपटांवर संशोधन करायला आलेल्या अमेरिकेच्या 30 वर्षांच्या एका महिलेवर फारुकीनं बलात्कार केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याप्रकरणी फारुकी जामिनावर बाहेर होता, पण कोर्टाच्या निर्णयानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी फारुकीच्या शिक्षेवर 2 ऑगस्टला सुनावणी होणार आहे. 


या प्रकरणामध्ये फारुकीला कमीतकमी सात वर्ष आणि जास्तीत जास्त जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. चित्रपटांच्या संशोधनाविषयी बोलण्यासाठी मी फारुकीच्या घरी गेले, तेव्हा दारुच्या नशेत असलेल्या फारुकीनं माझ्यावर बलात्कार केला असा आरोप महिलेनं केला होता. महिलेच्या या आरोपानंतर 19 जून 2015ला याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला होता.