मुंबई : प्रसिद्ध पॉपस्टार जस्टीन बीबरने त्याच्या भारतीय चाहत्यांची घोर फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. त्यांने चाहत्यांसाठी केवळ चारच गाणी म्हटली बाकीची रेकॉर्ड गाणी होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवी मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियममध्ये झालेल्या बीबरच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये स्वतः बीबरने 90 मिनिटांचा परफॉर्मन्स दिला खरा पण यावेळी त्यानं बहुतांश लाईव्ह न गाता, रेकॉर्डे सॉंग्जला फक्त ओठ हलवल्याचं समोर आले आहे.


साऱ्या देशातून हजारो रुपये खर्च करून जस्टीनच्या गाण्याची लाईव्ह झलक अनुभवण्यासाठी जवळपास 50 हजार तरूण-तरुणी या शो साठी नवी मुंबईत आले होते. आलिया, अरबाज खान, मलायका अरोरा, सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तर चक्क कुबड्या घेऊन जस्टीनच्या शो साठी आला.


शेकडो सेलिब्रिटीज आणि हजारो सर्वसामन्य तरूण तरूणींच्या सगळ्या आशा बीबरने बरबाद केल्याचे आता समोर आले आहे. बरं कार्यक्रम संपल्या संपल्या बीबीरनं देशातून काढता पाय घेतला. बीबीरनं या कार्यक्रमात फक्त चार लाईव्ह गाणी म्हटली, इतर सगळी गाण्यांसाठी ओठ हलवून निघून गेला.


या कार्यक्रमाचं सर्वाधिक तिकीट 70 हजार रुपये तर सर्वात कमी तिकीट 4 हजार रुपये होते. लाईव्ह कॉन्सर्टसाठी जस्टीननं 25 कोटी रुपये आकारल्याचंही काही माध्यमातून प्रसिद्ध झालं होतं. आता जर खरंच जस्टीनला 25 कोटी रुपये मिळाले असतील, आणि त्यानं भारतीय चाहत्यांची अशी घोर निराशा केली असेल तर किमान सॉरी तरी म्हणावं अशी प्रतिक्रिया  व्यक्त होत आहे. तर काहींनी टीकेची झोड उठवली आहे.