प्रभास परदेशात करणार आगामी चित्रपटाचं शूटींग
मुंबई : आघाडीचा तेलुगू अभिनेता प्रभासच्या आगामी चित्रपटाचे संपूर्ण शूटींग परदेशात होणार आहे. सिनेमाचं नाव अजून नक्की झालेलं नाही. शिवाय मुख्य नायिकेचाही शोध सुरू आहे. या फिल्ममध्ये एखाद्या नवोदित अभिनेत्रीला संधी मिळण्याची शक्यता आहे.
ही एक प्रेम कहाणी आहे. निर्माते सध्या फिल्मच्या लोकेशन्सचा विचार करत आहेत. दिग्दर्शक राधा कृष्ण कुमार यांच्या म्हणण्यानुसार फिल्मचं शूटींग जानेवारी 2017 मध्ये सुरू होईल. ही एक बिग बजेट फिल्म आहे.
गेल्यावर्षी प्रदर्शित झालेल्या बाहुबली चित्रपटात प्रभास मुख्य भूमिकेत दिसला होता. या फिल्मने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. तसेच आगामी धूम 4 मधून तो बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचंही सांगितलं जात आहे.