`रात्रीस खेळ चाले`चा पांडू लवकरच होणार विवाहबद्ध
`रात्रीस खेळ चाले` ही झी मराठीवरील प्रसिद्ध मालिका बंद झाली असली तरी त्यातील पात्रे अद्यापही प्रेक्षकांच्या आठवणीत आहेत. या मालिकेतील प्रसिद्ध पात्रांपैकी एक म्हणजे पांडू.
मुंबई : 'रात्रीस खेळ चाले' ही झी मराठीवरील प्रसिद्ध मालिका बंद झाली असली तरी त्यातील पात्रे अद्यापही प्रेक्षकांच्या आठवणीत आहेत. या मालिकेतील प्रसिद्ध पात्रांपैकी एक म्हणजे पांडू.
पांडू या व्यक्तिरेखेवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केले. इतकंच नव्हे त्याच्या तोंडातील 'कायता...इसरलयं' हा संवाद सर्वांच्याच तोंडी आला. लेखक प्रल्हाद कुडतरकरने पांडूची ही भूमिका साकारली होती.
आता हा पांडू लवकरच लग्नबंधनात अडकतोय. सध्या प्रल्हाद नकटीच्या लग्नाला यायचं हं या मालिकेसाठी संवाद लेखन करतोय. यादरम्यानच त्याचेही लग्न ठरलेय.
नुकताच त्याचा साखरपुडा पार पडला. एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत त्याने याबाबत सांगितले. अंजली कानडे हिच्याशी प्रल्हाद विवाहबद्ध होतोय. येत्या मेच्या अखेरीस त्यांचा विवाह पार पडणार आहे. प्रल्हाद यांची होणारी पत्नी योगा प्रशिक्षक आहे. मोजक्या लोकांच्या उपस्थितीत प्रल्हादचा साखरपुडा पार पडला.