मुंबई : टेलिव्हिजन अॅक्टर प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरणात नवा खुलासा झालाय. आत्महत्या करण्यापूर्वी प्रत्युषा नशेत होती अशी माहिती समोर आलीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मीडिया रिपोर्टनुसार, फॉरेन्सिक अहवालात प्रत्युषाच्या शरीरात इथाईल अल्कोहोलचे अंश आढळलेत. याची मात्र १४० एमजी इतकी होती. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार शरीरात ३० एमजीहून अधिक अल्कोहोलची मात्रा असता कामा नये. मात्र प्रत्युषाच्या शरीरात यापेक्षा अधिक अल्कोहोलचे प्रमाण होते. 


मिळालेल्या माहितीनुसार, प्रत्युषाच्या घरातून बियरचे तीन कॅन आणि दारुच्या बाटल्याही मिळाल्या. राहुलच्या चौकशीदरम्यान प्रत्युषाला मोठ्या प्रमाणात दारु पिण्याची सवय होती अशी माहिती मिळालीये. आत्महत्येपूर्वीही ती दारु प्यायली होती आणि नशेत तिने आत्महत्या केली अशी माहिती आहे.