जमशेदपूर : टीव्ही सेलिब्रेटी प्रत्युषा बॅनर्जीच्या मृत्यूने संपूर्ण टीव्ही इंडस्ट्रीत खळबळ उडवून दिलीये. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही रिपोर्टनुसार या प्रकरणानंतर राहुल राज सिंग फरार असल्याचे म्हटले जातेय. तर एका चॅनेलनी दिलेल्या माहितीनुसार राज फरार नसून संपर्कात असल्याचा दावा मुंबई पोलिसांनी केलाय.


राहुल हा जमशेदपूर येथे राहाणार होतो. तो राज्य स्तरावर क्रिकेटही खेळत असे. तो महेंद्रसिंग धोनीसोबतही क्रिकेट खेळलाय. 


राहुलने माता की चौकी, अंबर धारा या मालिकेत काम केले होते. राहुलची स्वत:ची इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीही आहे. याशिवाय युवा टायगर एंटरटेनमेंट आणि मॅग्नम ओपस नावाचे प्रॉडक्शन हाऊसेसही आहेत. 


राहुल युवा टायगरच्या नावाने क्रिकेट क्लबही चालवतो. तो प्रत्युषासोबत पॉवर कपलमध्येही दिसला होता.