प्रत्युषाने याआधीही केला होता आत्महत्येचा प्रयत्न
टीव्ही कलाकार प्रत्युषा बॅनर्जी शुक्रवारी मुंबईतील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. मीडिया रिपोर्टनुसार प्रत्युषाने दोन वर्षांपूर्वी आत्महत्येचा प्रयत्न केला होता.
मुंबई : टीव्ही कलाकार प्रत्युषा बॅनर्जी शुक्रवारी मुंबईतील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. मीडिया रिपोर्टनुसार प्रत्युषाने दोन वर्षांपूर्वी आत्महत्येचा प्रयत्न केला होता.
दरम्यान, शंकेची सुई सध्या प्रत्युषाचा बॉयफ्रेंड राहुल राज सिंग याच्यावर आहे. मात्र तपासानंतरच तिच्या मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल.
याआधी दोन वर्षांपूर्वीही प्रत्युषाने स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला होता अशी माहिती तिचा आधीचा बॉयफ्रेंड मकरंदने दिलीये.
जेव्हा प्रत्युषा आणि तो रिलेशनशिपमध्ये होते तेव्हा प्रत्युषाने कारमधून उडी घेत जीव देण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर दोघांचा ब्रेकअप झाला. दोन वर्षांपूर्वी प्रत्युषाने मकरंदविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती.