सर्वांदेखत राहुलनं प्रत्युषाच्या कानाखाली लगावली होती?
छोट्या पडद्यावरची अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी हिनं आत्महत्या केल्याचं समजताच छोट्या पडद्यासहीत बॉलिवूडलाही धक्का बसला. मिळालेल्या माहितीनुसार, प्रत्युषाला आत्महत्या करण्याच्या काही तास अगोदर मालाडच्या कार्निव्हल मॉलमध्ये पाहण्यात आलं होतं. यावेळी ती तिचा बॉयफ्रेंड राहुल राज सिंग याच्यासोबत होती.
मुंबई : छोट्या पडद्यावरची अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी हिनं आत्महत्या केल्याचं समजताच छोट्या पडद्यासहीत बॉलिवूडलाही धक्का बसला. मिळालेल्या माहितीनुसार, प्रत्युषाला आत्महत्या करण्याच्या काही तास अगोदर मालाडच्या कार्निव्हल मॉलमध्ये पाहण्यात आलं होतं. यावेळी ती तिचा बॉयफ्रेंड राहुल राज सिंग याच्यासोबत होती.
मॉलमध्येच असताना राहुल आणि प्रत्युषा यांचं जोरदार भांडणही झालं होतं. हे भांडण इथंवरच थांबलं नाही तर राहुलनं प्रत्युषाच्या सर्वांदेखत कानाखालीही लगावली होती, असं 'स्पॉटबॉय' या वेबसाईटनं म्हटलंय. यामुळे, प्रत्युषा हेलकावे खात खाली पडली. तिच्या हातातील वस्तूही इतरत्र भिरकावल्या गेल्या... त्यानंतर काही तासांनी बातमी आली ती प्रत्युषाच्या आत्महत्येची...
ती आत्महत्याच - पोस्टमॉर्टेम रिपोर्ट
प्रत्युषाच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये मात्र तिचा मृत्यु जीव गुदमरल्याने झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे प्रत्युषाने आत्महत्या केल्याचचं स्पष्ट झालं आहे.
आई-वडिलांनी तक्रार दाखल केलेली नाही
प्रत्युषाच्या आई-वडलांनी तिच्या मृत्युसाठी राहुललाच जबाबदार धरलं आहे. तिच्या आई-वडलांनीही कोणाविरोधात तक्रार केलेली नाहीये. त्यामुळे आता प्रत्युषाने आत्महत्या का केली याचा शोध पोलीस घेत आहेत.
प्रत्युषा पर्सनल लाईफमध्ये खूपच डिस्टर्ब होती. बॉयफ्रेण्ड राहुल राज सिंग बरोबर प्रत्युशा बऱ्याच दिवसांपासून सिरीयस रिलेशनशीपमध्ये होती तसचं दोघं लवकरच लग्नही करणारही होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या दोघांमध्ये तणावाचे वातावरण होते. त्यामुळेच या तणावाखाली प्रत्युषाने आत्महत्या केल्याची चर्चा आहे.
प्रत्युषाचं शव पाहण्यापासून राहुलला रोखलं
शुक्रवार रात्रीपासून गायब असलेला राहुल सिध्दार्थ हॉस्पिटलमध्ये अचानक दाखल झाला. मात्र प्रत्युषाच्या आई-वडलांनी राहुलला प्रत्युषाचे शव बघण्यापासून रोखले. यामुळे हॉस्पिटलमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झालं होतं. मात्र, पोलिसांनी मध्यस्थी करत राहुलला प्रत्युषाच्या बॉडीजवळ जाऊ दिले. गायब असलेला राहुल अचानक 'नौटंकी' करत हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यामुळे अनेकांनी भुवया उंचावल्या. पोलिसांनी राहुलचीदेखील चौकशी केलीय. प्रत्युषाच्या आई-वडलांनी तिच्या मृत्युसाठी राहुललाच जबाबदार धरलं आहे..राहुलने मात्र आपण निर्दोष असल्याचं म्हटलय.