पैशासाठी काय करायची प्रत्युषा ?
अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीच्या मृत्यूबाबत आणि तिच्या खासगी आयुष्याबाबत रोज नवे खुलासे होत आहेत.
मुंबई: अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीच्या मृत्यूबाबत आणि तिच्या खासगी आयुष्याबाबत रोज नवे खुलासे होत आहेत. प्रत्युषा अनेकवेळा आपल्या मोलकरणीकडून गाडी भाड्यासाठी आणि औषधांसाठी उसने पैसे घ्यायची, हे आता समोर आलं आहे.
प्रत्युषाची मोलकरीण रेणू सिन्हानंच पोलीस चौकशीमध्ये ही माहिती दिली आहे. प्रत्युषाचा बॉयफ्रेंड राहुलला प्रत्युषाच्या आईचं मुंबईत राहणं आवडत नव्हतं, राहुल आणि प्रत्युषाचे वाद व्हायचे, राहुलच्या अंगावर खरचटल्याच्या खुणाही मी पाहिल्या आहेत, असंही रेणूनं सांगितलं आहे.
घरात टेबल नसताना कमी उंची असलेली प्रत्युषा गळफास लावून घेण्यासाठी पंख्यापर्यंत पोहोचली कशी, असा सवालही रेणूनं उपस्थित केला.