मुंबई : अभिनय करणे ही माझी आवड आहे, मी तो शेवटपर्यंत करणार असं सुप्रसिध्द अभिनेत्री करिना कपूरने म्हटलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गरोदरपणामुळे जगभरात सध्या चर्चेत असलेली अभिनेत्री करिना कपूर-खानने, देशभरात नावाजलेल्या लॅक्मे फॅशन शोमध्ये डिझायनर सब्या साचीसाठी रॅम्प वॉक केला आहे.


लॅक्मे फॅशन वीकच्या सांगता शोमध्ये सब्या साचीने डिझाईन केलेले वस्त्र घालून अभिनेत्री करिना कपूरने रॅम्प वॉक केला आहे.  


करिना कपूरने गरोदरपणात रॅम्प वॉक करुन प्रत्येक स्त्रीसाठी एक उदाहरण कायम केले आहे.


गरोदर स्त्रीया चालतात पण मी उडू शकते आणि सगळी कामं करू शकते. माझा मुळात स्वाभावचं असा असल्याचं लॅक्मे फॅशन शो दरम्यान झालेल्या मुलाखतीत अभिनेत्री करिना कपूर-खानने सांगितले.


गरोदरपणातला हा रॅम्प वॉक माझ्यासाठी अविस्मरणीय असून, येणाऱ्या बाळाबरोबर हा केलेला रॅम्पवॅाकचा प्रत्येक क्षण माझ्यासाठी खास असल्याचं तिने म्हटलं आहे.