मुंबई: प्रिती झिंटा आणि तिचं बॉयफ्रेंड जेन गुडेनफ हे दोघं लग्न करणार असल्याच्या चर्चा गेले काही दिवस जोरदार सुरु होत्या. हे दोघंही एप्रिल महिन्यात लग्न करणार आहेत, अशी माहिती मिळतेय. लॉस ऐंजेलिसमध्ये हा सोहळा पार पडणार असल्याचं बोललं जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जेन हा आर्थिक सल्लागार आहे, तसंच त्यानं मार्शल स्कूल ऑफ बिझनेसमधून मॅनेजमेंट ग्रॅज्युएशनचा कोर्सही केला आहे. लॉस ऐंजेलिसच्या चर्चमध्ये हा विवाहसोहळा होणार असून जवळच्याच व्यक्तींना बोलवण्यात येणार असल्याचं समजतंय.


लग्न लॉस ऐंजेलिसमध्ये होणार असलं तरी मुंबईमध्येही सोहळा होणार आहे, या सोहळ्याला बॉलीवूडबरोबरच इतर क्षेत्रांमधील मान्यवरही उपस्थित राहण्याची शक्यता आहे.