प्रिती झिंटासारखं इतर ५ बॉलिवूड अभिनेत्यांनी केलं गुपचूप लग्न, चाहत्यांना बसला धक्का
नाही... नाही` म्हणत बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा अखेर परदेशी बाबू आणि तिचा बॉयफ्रेंड गुडएनफ याच्यासोबत विवाह बंधनात अडकलीय.
मुंबई : नाही... नाही' म्हणत बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा अखेर परदेशी बाबू आणि तिचा बॉयफ्रेंड गुडएनफ याच्यासोबत विवाह बंधनात अडकलीय.
गुडएनफ अमेरिकेतील बिझनेसमन आहे आणि तो प्रीतीहून १० वर्षांनी लहान आहे. प्रीती आणि गुडएनफ यांचा विवाह एका खाजगी सोहळ्यात पार पडला.
यापूर्वी बॉलिवूडमध्ये पाच अभिनेते होते त्यांच्या लग्नामुळे अनेकांना धक्का बसला होता.
१) परवीन दुसांज आणि कबीर बेदी
कबीर बेदी आणि त्याच्या बायकोच्या वयात २४ वर्षांचे अंतर आहे. ते अनेक दिवसांपासून एकमेंकाना डेट करत होते. त्यांच्या अचानक लग्नाने अनेकांनी भुवया उंचविल्या होत्या तर कबीर बेदींची मुलगी पूजा बेदीसह अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता.
२) राणी मुखर्जी आणि आदित्य चोपडा
ही ओपन सिक्रेट लवस्टोरी होती आणि हे सर्वांना माहिती होते. पण त्यांनी कोणाला सांगितले, अचानक एक दिवशी लग्नाची बातमी आली.
३) जॉन इब्राहिम आणि प्रिया रुंचाल
बिपाशा बसूशी ब्रेकअप झाल्याने एका वर्षाच्या आत जॉन इब्राहिमने प्रिया रुंचालशी गुपचूप लग्न केले. जॉनने लग्न केल्याने असंख्या महिला चाहत्यांचे हृदय तुटले.
४) कुणाल कपूर आणि नयना बच्चन
कुणाल आणि नयना यांचे प्रेमसंबंध होते हे सर्वांना माहित होतं. पण एकेदिवशी दोघे परदेशात गेले आणि लग्न करून आले.
५) संजय दत्त आणि मान्यता दत्त
संजय दत्तने आपल्या दुसरी पत्नी रहेना पिल्लेशी २००५ मध्ये घटस्फोट घेतल्यानंतर तो मान्यता दत्तसोबत दिसू लागला होता.
पण एकेदिवशी गोव्यातील एका खासगी समारंभात दोघांनी लग्न केले.