मुंबई : 'चला हवा येऊ द्या'मध्ये निलेश साबळेच्या अनुपस्थितीतही निलेश साबळेची कामगिरी, हरहुन्नरी अभिनेता प्रियदर्शन जाधव पार पाडणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रियदर्शन जाधव निवेदनाची सूत्रे सांभाळणार आहे. चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाच्या सर्व लोकप्रियतेमध्ये सिंहाचा वाटा आहे,  तो डॉ. निलेश साबळेचा. निवेदन, लेखन आणि दिग्दर्शन अशा तीनही जबाबदाऱ्या त्याने यशस्वीपणे पार पाडल्या. 


मात्र डॉ. निलेश साबळे प्रकृती अस्वस्थ्यामुळे काही आठवडे विश्रांती घेणार आहे. शो मस्ट गो ऑन हा आपल्या मनोरंजन इंडस्ट्रीचा आणि कलाकारांचा धर्म. निलेशच्या विश्रांती दरम्यान, अभिनेता प्रियदर्शन जाधव या कार्यक्रमाच्या निवेदनाची सूत्रे सांभाळणार आहे.