न्यूयॉर्क : सध्या हॉलिवूडमध्ये दिमाखात वावरणारी बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा शूट दरम्यान जखमी झालीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'क्वांटिको'च्या सेटवर प्रियांकासोबत ही दुर्घटना घडली. यानंतर तातडीनं प्रियांकाला उपचारासाठी हॉस्पीटलमध्ये हलवण्यात आलंय. तिची प्रकृती व्यवस्थित असून सध्या आराम करतेय. उपचारानंतर प्रियांकाला हॉस्पीटलमधून सुट्टी देण्यात आलीय. 


34 वर्षीय प्रियांकाला झालेली दुखापत ही फार गंभीर नसल्याचं सांगितलं जातंय. 'क्वांटिको'च्या सेटवर गुरूवारी एक स्टंट सीन शूट करताना प्रियांकाच्या डोक्याला दुखापत झाली.


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढच्या एक - दोन दिवसानंतर ती पुन्हा शूटसाठी सेटवर उपस्थित राहणार आहे. डॉक्टरांनी तिला आराम करण्याचा सल्ला दिलाय.