वॉशिंग्टन : बॉलिवूड नाव कमावल्यानंतर आता हॉलिवूडमध्ये आपले नशिब अजमावणाऱ्या प्रियंका चोप्राने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल ओबामा यांची भेट घेतली. वॉशिंग्टन डिसीमध्ये व्हाईट हाऊसच्या 'करसपाँडंट डिनर'च्या निमित्ताने ती बराक दांम्पत्यांना भेटली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या कार्यक्रमात पत्रकारांसोबत अमेरिकेतील अनेक सेलिब्रिटींना निमंत्रित करण्यात आले होते. हा ओबामांचा शेवटचा 'करसपाँडंट डिनर' होता. कार्यक्रमावेळी ओबामांनी डोनल्ड ट्रम्प, हिलरी क्लिंटन यांच्यावर कोपरखळी केली. या कार्यक्रमाला आपल्याला निमंत्रण दिले म्हणून प्रियंकाने ओबामांचे आभार मानले. बराक गंमतीशीर आणि सुंदर आहेत, अशी प्रतिक्रिया प्रियंकाने यावेळी व्यक्त केली.



हॉलिवूडमधल्या विशेष निमंत्रितांसाठी असलेल्या या डिनर प्रोग्रामला प्रियंकालाही बोलवण्यात आले होते. प्रियांकाने तिच्या इन्स्टाग्रामवर या भेटीची छायाचित्रे पोस्ट केली असून, बराक आणि मिशेल यांना भेटून आनंद झाल्याचे तिने म्हटले आहे. क्वांटिकोमधून अमेरिकेमध्ये लोकप्रिय झालेली प्रियांका सध्या अमेरिकेत बेवॉच या पहिल्या हॉलिवूडपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे.