VIDEO : क्वांटिकोसाठी प्रियांकाला पुन्हा एकदा `पीपल्स चॉईस अॅवॉर्ड`
आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या नावाची मोहर उमटवणारी भारतीय अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिला पुन्हा एकदा `पीपल्स चॉईस पुरस्कार २०१७`नं गौरविण्यात आलंय.
लॉस एन्जेलिस : आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या नावाची मोहर उमटवणारी भारतीय अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिला पुन्हा एकदा 'पीपल्स चॉईस पुरस्कार २०१७'नं गौरविण्यात आलंय.
'ग्रेज अॅनाटॉमी'ची अभिनेत्री एलेन पोम्पिओ आणि वियोला डेविज यांना मागे टाकत प्रियांकांना 'बेस्ट ड्रॅमॅटिक टीव्ही अभिनेत्री' हा पुरस्कार पटकावलाय. प्रियांकाला हा पुरस्कार तिच्या 'क्वाटिंको' या टीव्ही सिरियलसाठी देण्यात आलाय.
या पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर प्रियांकानं बाजुला बसलेल्या आपल्या आईला मिठी आणि मग ती स्टेजच्या दिशेला वळली.
तुम्हा सर्वांचे आभार... हा प्रवास माझ्यासाठी खरोखरच अद्भूत होता. माझ्यासोबत या श्रेणीत नामांकित प्रत्येक महिला, या सर्व उत्कृष्ट अभिनेत्री मी टेलिव्हिजन शो करण्यामागचं कारण आहेत...
या दरम्यान 'बेवॉच'चा तिचा सहकलाकार ड्वेन जॉनसन प्रियांकाला चिअर करताना दिसला.