धक्कादायक ! स्वतःच्या सिनेमाचा प्रिव्ह्यू पाहून निर्मात्याची आत्महत्या
मल्याळम सिनेमाचे निर्माते अजय कृष्णन याने गुरुवारी आपल्याच राहत्या घरी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांच्या एका सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कृष्णन याने स्वत:च्याच सिनेमाचा प्रिव्ह्यू पाहिल्यानंतर आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे.
मुंबई : मल्याळम सिनेमाचे निर्माते अजय कृष्णन याने गुरुवारी आपल्याच राहत्या घरी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांच्या एका सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कृष्णन याने स्वत:च्याच सिनेमाचा प्रिव्ह्यू पाहिल्यानंतर आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे.
अजय बॉक्स ऑफिसवर सिनेमाला किती यश मिळणार याबाबत चिंतीत होता. अजयने याबाबत त्याच्या आई-वडिलांना देखील सांगितलं होतं. या सिनेमासाठी अजयने ४ कोटी रुपये गुंतवले होते आणि तो आर्थिक अडचणींमध्ये होता.
अजयने अनेक सीरिअल्स आणि सिनेमांमध्ये देखील भूमिका केल्या आहेत.