`उडता पंजाब`ला पंजाब-हरियाणा हायकोर्टाने घातली अट
उडता पंजाबला `अ` श्रेणीसकट फक्त एकच सीन कट करण्याचे आदेश देऊन सेन्सॉर बोर्डाने आणि मुंबई हायकोर्टाने सोमवारी उडता पंजाब रिलीज करण्यास मंजूरी दिली. त्यामुळे चाहत्यांनी आणि उडता पंजाबच्या टीमने मोठ्या जल्लोषात या हायकोर्टाच्या निर्णयाचे स्वागत केलं. पण उजता पंजाब टीमसमोरची कटकट काही संपत नाही आहे.
मुंबई : उडता पंजाबला 'अ' श्रेणीसकट फक्त एकच सीन कट करण्याचे आदेश देऊन सेन्सॉर बोर्डाने आणि मुंबई हायकोर्टाने सोमवारी उडता पंजाब रिलीज करण्यास मंजूरी दिली. त्यामुळे चाहत्यांनी आणि उडता पंजाबच्या टीमने मोठ्या जल्लोषात या हायकोर्टाच्या निर्णयाचे स्वागत केलं. पण उजता पंजाब टीमसमोरची कटकट काही संपत नाही आहे.
उडता पंजाबला आता पंजाब-हरियाणा हायकोर्टाने प्री-स्किनिंगची अट घातली आहे. हे प्री-स्क्रिनिंग १४ जूनला होणार आहे. पंजाब-हरियाणा हायकोर्टाचे प्रतिनिधी उडता पंजाबचे संपूर्ण विश्लेषण करून झाल्यानंतरच ही फिल्म प्रदर्शित करायचे की नाही हे ठरवतील.