नवी दिल्ली : सीझन ब्रेकनंतर अमेरिकेन टिव्ही शो 'क्वांटिको' पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. शोच्या नव्या ट्रेलरमध्ये प्रियंका चोप्राचा हॉट अवतार दिसतोय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शोचा मधला सीझन ब्युरो हेड क्वार्टरवर बॉम्बस्फोटासोबत संपला होता. बॉम्बस्फोटाच्या जाळ्यात प्रियंका फसली गेली हे दाखवण्यात आले होते. या नव्या एपिसोडमध्ये या स्फोटांमागच्या सूत्रधाराचा शोध घेणार आहे. ज्यामुळे ती स्वत:ला निर्दोष सिद्ध करु शकेल. मात्र हे किती कठीण असणार आहे हे सर्व या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलेय. 


ट्रेलरमध्ये प्रियंकाचा हॉट सीनही दाखवण्यात आलाय. आपल्या अभिनयासाठी पीपल्स चॉईड अॅवॉर्डमध्ये प्रियंकाने लोकप्रिय अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळवलाय. लवकरच ती ऑस्कर पुरस्कार सोहळ्यातही पुरस्कार प्रदान करणार आहे.