मुंबई : बॉलीवूडची अभिनेत्री राधिका आपटेचा आगामी सिनेमा फोबियाचा फर्स्ट लूक प्रकाशित झाला आहे. राधिका विकी रजानीच्या सायकोलॉजीकल थिमवर आधारीत फोबिया चित्रपटात दिसणार आहे. 


हा सिनेमा पवन कृपलानी यांनी दिग्दर्शित केला आहे, राधिका सध्या सुपरस्टार रजनीकांतच्या आगामी काबिल चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे, तामिळ गँगस्टरवर आधारीत या सिनेमाचं शुटिंग सध्या मलेशियात सुरू आहे. या काबिल सिनेमात राधिका रजनीकांतच्या बायकोची भूमिका साकारत आहे.