मुंबई : अभिनेत्री प्रत्युशा बॅनर्जीच्या आत्महत्या प्रकरणाने वेगळं घेतलंय. प्रत्युशाचा बॉयफ्रेण्ड राहुल राज सिंगविरोधात प्रत्युशाची आई सोमा बॅनर्जी यांनी मुंबई पोलिसांकडे गुन्हा दाखल केलाय. प्रत्युशाच्या आत्महत्येला राहुलच कारणीभूत असल्याचं सोमा बॅनर्जींनी म्हटलंय.


काय घडलं होतं आदल्या रात्री?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई पोलिसांच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रत्युषाच्या आत्महत्येच्या एक दिवस आधी प्रत्युषाचा बॉयफ्रेण्ड राहुल राज आपल्या एका मैत्रिणीच्या घरी पार्टीला एकटाच गेला होता. 


पार्टीमध्ये राहुलच्या काही जुन्या मैत्रिणीही आल्या होत्या. पार्टीमध्ये राहुलने खुप मद्यप्राशन केले होते. राहुलने आपल्या काही मैत्रिणींबरोबर खुपच जवळीक निर्माण केली होती. या गोष्टीची माहिती प्रत्युषाच्या पार्टीत उपस्थित असलेल्या काही मैत्रिणींनी तिला दिली होती. त्यामुळे  भडकलेल्या प्रत्युषानेही आपल्या घरी मोठ्या प्रमाणात मद्यप्राशन केले.


आत्महत्येच्या दिवशी सकाळी या गोष्टीवरुन राहुल आणि प्रत्युषात या गोष्टीवरुन खूप भांडण झालं होतं. एव्हढच नाही तर राहुलने प्रत्युषाला ठरलेलं लग्न तोडण्याची धमकीही दिली होती तसेच तिला मारहाणही केली होती.


आर्थिक कारण?


राहुल आणि प्रत्युषाचं रिलेशन खऱाब होण्यामागे हे एकचं कारण नव्हतं. सूत्रांच्या मते, एचडीएफसी, आयसीआयसीआय आणि कोटक महिंद्रा या तीन बॅंकांमध्ये प्रत्युषाचं आपल्या आई-वडिलांबरोबर जाईंट अकाऊंट होतं. 


परंतू काही महिन्यांपूर्वी राहुलने प्रत्युषाला फोर्स करुन या जॉईंट अकाऊंटचे विथड्राल पावर हिसकावून घेतले होते. यामुळे तिचे आईवडील अकाऊंटमधून पैसे काढू शकत नव्हते. तसेच त्याने प्रत्युषाबरोबर मएक नवं जाईंट अकाऊंट उघडलं होतं. तसेच तिचं डेबिट कार्डही तो स्वत:जवळचं ठेवत होता. प्रत्युषाला राहुलशी लग्न करायचे होतं मात्र राहुल प्रत्युषाचा फक्त पैश्यांसाठी वापर करत होता.


नववर्षाला विवाहाचा घाट?


१४ एप्रिल रोजी बंगाली नववर्षाच्या दिवशी प्रत्युषा राहुल बरोबर लग्न करुन आपलं स्वप्न पूर्ण करणार होती. मात्र राहुल सातत्याने प्रत्युषाला रिलेशन तोडण्याची धमकी देत होता. 


याच दरम्यान राहुलच्या अनेक गोष्टींचा प्रत्युषासमोर खुलासा झाला होता. यामध्ये राहुलचे आधीच लग्न झालेलं असल्याची तसेच त्याची एक्स गर्लफ्रेण्ज सलोनी राज बरोबरही त्याचे अजुन संबंध असल्याची माहिती प्रत्युषाला मिळाली होती.


एकटी पडली होती प्रत्युषा?


राहुलने प्रत्युषाला तिच्या मित्रांपासून तसेच तिच्या आईवडिलांपासूनही तोडलं होतं. त्यामुळेच प्रत्युशाचा बॉयफ्रेण्ड राहुल राज सिंगविरोधात प्रत्युशाची आई सोमा बॅनर्जी यांनी मुंबई पोलिसांकडे गुन्हा दाखल केलाय. प्रत्युशाच्या आत्महत्येला राहुलच कारणीभूत असल्याचं सोमा बॅनर्जींनी म्हटलंय. 


आरोप - प्रत्यारोप


राहुलसोबत प्रत्युशा लग्न करणार होती, मात्र गेल्या काही दिवसात दोघांमध्ये वाद वाढले होते. यातूनच प्रत्युशाला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप प्रत्युशाच्या आईने लावलाय. राहुलने आतापर्यंत ७ मुलींना फसवल्याचं सांगत पोलिसांनी या प्रकरणी योग्य तपास करावा, अशी विनंती त्यांनी केलीय.


तर राहुलच्या वडिलांनी आपल्या मुलावर केलेले आरोप बिनबुडाचे आहेत, असं म्हटलंय. त्यामुळे आता या प्रकरणात अजुन कोणते नविन खुलासे होतात हे बघणं उत्सुकतेचं ठरणार आहे.