मुंबई : रजनीकांतचा मोस्ट अवेटेड चित्रपट कबाली अखेर रिलीज झाला आहे. रजनीकांतच्या फॅन्स त्याचा हा चित्रपट पाहण्यासाठी वेडे झाले आहेत. रजनीच्या या चित्रपटाला पहिल्याच दिवशी प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं आहे. बॉक्स ऑफिसचे सगळे रेकॉर्ड कबाली मोडेल असं बोललं जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कबालीचं कौतुक सगळचे करत असले तरी रजनीकांतला मात्र कबालीबाबतची एक प्रतिक्रिया ऐकण्यासाठी आतूर झाला आहे. कबालीबाबद रजनीकांतला पी. राजबहादूर यांची प्रतिक्रिया हवी आहे. 


71 वर्षांचे पी. राजबहादूर हे बंगळुरुमधल्या बसचे निवृत्त ड्रायव्हर आहेत. 1970 मध्ये रजनीकांत ज्या बसचा कंडक्टर होता, त्या बसचे राजबहादूर हे ड्रायव्हर होते. तेव्हापासूनच रजनीकांत आणि राजबहादूर यांची मैत्री आहे. रजनीकांतचा कबाली पाहून त्याला चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया देणार आहे, असं राजबहादूर म्हणाले आहेत. 


रजनीकांतचे सगळेच चित्रपट मी पाहतो. या चित्रपटांबाबत मी त्याला फोनकरून प्रतिक्रिया देतो. रजनीकांतही माझ्या फोनची नेहमीच वाट पाहत असतो, असं राजबहादूर म्हणाले आहेत.