मुंबई : बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना म्हणजेच काका यांचा, आशीर्वाद हा बंगला पाडण्यास सुरूवात झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंगळूर येथील उद्योजक शशिकांत शेट्टी यांनी हा बंगला विकत घेतला आहे, या ठिकाणी ते लवकरच नवीन इमारतीचे बांधकाम सुरू करणार आहेत.


या बंगल्याची खासियत म्हणजे, राजेश खन्ना आशीर्वाद बंगल्यात रहायला आले, आणि त्यांचे चित्रपट मोठ्या प्रमाणात यशस्वी झाले. काका सुपरस्टार झाले. 


राजेश खन्ना यांची दोन्ही मुली ट्विंकल आणि रिंकी यांनी बंगला विकण्याचा निर्णय घेतला होता. एकून ६५०० स्के. फुट हा बंगला उभा होता.


शशीकांत शेट्टी हे एका कंपनीचे संस्थापक आहेत, त्यांनी २०१४ साली ९५ कोटीला हा बंगला विकत घेतला.