आश्चर्यकारक, पण सत्य... रजनीकांत फक्त एका नेत्याच्या ट्विटरला फॉलो करतात, जाणून घ्या कोण ते
सुपरस्टार रजनीकांत यांचा कबाली गेल्या ५ दिवसापासून देशासह परदेशात धुमाकूळ घालत आहे. आतापर्यंत आलेल्या माहितीनुसार एकूण ४०० कोटींपर्यंत मजल मारली आहे.
नवी दिल्ली : सुपरस्टार रजनीकांत यांचा कबाली गेल्या ५ दिवसापासून देशासह परदेशात धुमाकूळ घालत आहे. आतापर्यंत आलेल्या माहितीनुसार एकूण ४०० कोटींपर्यंत मजल मारली आहे.
रजनीकांत हे केवळ सुपरस्टार नाही तर एक दंतकथा बनले आहेत. रजनीकांत यांनी काहीही केलं तरी त्याची बातमी होते. आता त्यांच्या ट्विटरवरून बातमी होत आहे.
रजनीकांत यांना ट्विटरवर किती फॉलोवर्स
रिअल वर्ल्डप्रमाणेच व्हर्च्युअल वर्ल्डमध्ये रजनीकांत यांना खूप मोठा चाहता वर्ग आहे. ट्विटरवर त्यांना ३० लाख ५० हजार जणांनी फॉलो केले आहे.
पण तुमचा विश्वास बसणार नाही. सुपरस्टार रजनीकांत यांनी एका राजकारणी नेत्याला फोलो केले आहे. इतक कोणत्याही राजकारण्याला रजनीकांत यांनी फॉलो केले नाही.
तुम्ही गेस करा कोण आहे ते?
हो तुम्ही योग्य गेस केले, भारतातील सर्वात जादुई व्यक्तिमत्त्व असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रजनीकांत यांनी फॉलो केले आहे.
विशेष म्हणजे रजनीकांत यांनी केवळ १९ जणांना फॉलो केले आहे. त्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा समावेश आहे.
मोदींना ट्विटरवर किती फॉलोवर्स
यात काहीच शंका नाही की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जगभऱात लाखो करोडो चाहते आहे. तसेच त्यांना ट्विटरवरही फोलो करणारे अनेक लोक आहेत. एकूण २ कोटी १५ लाख जण मोदींना ट्विटरवर फोलो करतात.