मुंबई: प्रत्युषा बॅनर्जीच्या आत्महत्येप्रकरणी अभिनेत्री राखी सावंत आणि डॉली बिंद्रा अडचणीत आल्या आहेत. सिन्टा म्हणजेच सिने ऍन्ड टीव्ही आरटीस्ट असोसिएशन या दोघींना नोटीस बजावणार आहे. प्रत्युषाच्या मृत्यूनंतर या दोघींनी दिलेल्या प्रतिक्रियांमुळे ही नोटीस बजावण्यात येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राखी आणि डॉलीनं या संवेदनशील प्रकरणामध्ये प्रसिद्धीसाठी खालच्या पातळीवर जाऊन प्रतिक्रिया दिल्या, त्यामुळे सिन्टाचे अध्यक्ष अमित भेल आणि अनेक जण नाराज झाले, त्यामुळे ही नोटीस पाठवण्यात येणार आहे. खुद्द अमित भेल यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.


सिन्टाची वार्षिक सर्वसाधारण सभा १ मे ला होणार आहे. यासभेमध्ये राखी आणि डॉलीवर बंदी घालण्याचा प्रस्ताव मांडू असंही अमित भेल म्हणाले आहेत. 


प्रत्युषाच्या पार्थिवाचा फोटो काढून तिच्या डोक्यावर सिंदूर पाहिल्याची प्रतिक्रिया डॉली बिंद्रानं दिली होती. तर पंख्यांमुळे आत्महत्या होत असल्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पंख्यांवर बंदी घालावी अशी मागणी राखी सावंतनं केली होती.