मुंबई : करण जोहरच्या वादात अडकलेल्या 'ऐ दिल है मुश्किल' या सिनेमाच्या प्रमोशनसाठी सिनेमातील स्टारकास्ट सरसावली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनुष्का शर्मा, ऐश्वर्या राय बच्चन आणि रणबीर हे तिघेही कलाकार या निमित्तानं एकाच सेटवर पाहायला मिळणार आहेत ते 'द कपिल शर्मा शो' या कार्यक्रमात... 


अनुष्का - ऐश्वर्याच्या गप्पा 

या निमित्तानं पहिल्यांदाच हे तिघेही कलाकार या सिनेमाच्या प्रमोशनसाठी एकत्र येणार आहेत. आत्तापर्यंत केवळ रणबीर या सिनेमाच्या प्रमोशनसाठी विविध कार्यक्रमांत हजेरी लावताना दिसला होता. 



या भागाचं शुटिंग बुधवारी मुंबईत पार पडलं.