ब्रेकअप के बाद रणबीर कॅट पुन्हा एकत्र?
नुकतीच रणबीर कपूरच्या दिल्लीवाल्या गर्लफ्रेंडची अफवा कानावर आलेली... मात्र रणबीर आणि कतरिना ह्यांची लव्हस्टोरी ही कायमच चर्चेचा विषय ठरलीये.
मुंबई : नुकतीच रणबीर कपूरच्या दिल्लीवाल्या गर्लफ्रेंडची अफवा कानावर आलेली... मात्र रणबीर आणि कतरिना ह्यांची लव्हस्टोरी ही कायमच चर्चेचा विषय ठरलीये.
कुठे दिसले एकत्र
करण जोहरने त्याच्या ४४ वाढदिवसाची पार्टी काल लंडनमध्ये दिली तेव्हा रणबीर आणि कॅट पुन्हा एकदा एकत्र दिसून आले. ब्रेक अपनंतर पहिल्यांदाच ही जोडी एकत्र पाहायला मिळाल्याने दोघांमध्ये पुन्हा एकदा सूर जुळतील असे वाटू लागले आहे.
पण नंतर असं करणार...
ब्रेकअपनंतर रणबीर आणि कॅट एकमेकांकडे बघतही नसतं पण त्यांच्या जग्गा जासूस या चित्रपटाकरता ते पुन्हा एकत्र आलेले. मोरोक्कोमध्ये या चित्रपटाचे शूटींग संपल्यानंतरच ते करण जोहरच्या पार्टीला जाणार होते. मात्र भारतात परत येतांना दोघेही वेगवेगळे येणार आहेत.
आणखी एका जोडीवर संशय...
रणबीर कॅटबरोबरच आणखी एका जोडीवर आता संशय येऊ लागलाय... पार्टीमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा येणार म्हणून चक्क आलिया भट्ट पार्टीत आलीच नाही तर ती वरुण धवनसोबत शूटींगकरता मुंबईतच थांबली. पार्टीमध्ये शाहरुख खान, करिना कपूर, श्वेता बच्चन-नंदा, सैफ अली खान यांसारखे अनेक कलाकार उपस्थित होते.