मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूर गरोदर असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून सुरु आहेत. काहीच दिवसांपूर्वी करीना तिचा नवरा सैफ अली खानबरोबर लंडनला फिरायला गेली होती. गरोदर असल्यामुळे करीना विश्रांतीसाठी लंडनला गेली असल्याची चर्चा सुरु होती. सैफ आणि करीनानं मात्र या बातम्यांवर काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या बातम्यांवर करीनाचे वडिल रणधीर कपूर यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. सैफ आणि करीनानं मला याबाबत अजून काहीही सांगितलेलं नाही, पण आता या दोघांनी याचा विचार करायला हवा, असं रणधीर कपूर म्हणाले आहेत.