मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्या नात्याबाबत सध्या बॉलीवूड वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. या दोघांनी जरी खुलेपणाने अद्याप आपल्या नातेसंबंधाबाबत विधान केले नसले तरी या दोघांची जवळीक पाहता लवकरचं हे जोडप लग्नाच्या बोहल्यावर चढणार असल्याच्या चर्चा रंगतायत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्याच महिन्यात झालेल्या अॅवॉर्ड शोमध्ये दोन्ही अभिनेत्यांचे आई-वडील उपस्थित होते आणि ते सर्व एकत्र बसले होते. जेव्हा बेस्ट अॅक्टर म्हणून रणवीरच्या नावाची घोषणा झाली त्यावेळी त्याने दीपिकाच्या आई-वडिलांचे आशीर्वाद घेतले. 


त्यानंतर जेव्हा दीपिकाच्या नावाची घोषणा झाली त्यावेळीही दीपिकाने आपल्या आई-वडिलांचा आशीर्वाद घेतल्यानंतर रणवीरच्या आई-वडिलांच्या पाया पडली. हे पाहता या दोघांच्या घरच्यांनीही हे नाते स्वीकारल्याचे दिसतेय.


तसेच अनेक शो, समारंभामध्येही दीपिका-रणवीर एकत्र दिसले होते. दीपिका सध्या तिच्या हॉलीवूड चित्रपटासाठी कॅनडात आहे. त्यामुळे रणवीरने यंदाचा वॅलेंटाईन डे दीपिकासोबत टोरांटोमध्ये साजरा केला.