मुंबई : बॉलिवूड सुपरस्टार रणवीर सिंग सध्या खूपच वेगळ्या लूक मध्ये दिसतोय. त्याच्या रिअल लाईफमध्ये ही बराच बदलला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'बाजीराव मस्तानी' मध्ये मोठ्या मिश्या ठेवणारा रणवीर आता क्लिन शेवमध्ये दिसतोय. रणवीर सध्य़ा आदित्य चोपडाच्या आगामी सिनेमाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. रणवीर 'बेफिक्रे'च्या शुटींगमध्ये  व्यस्त आहे.


बेफिक्रे या सिनेमात रणवीरचा हटके लूक दिसतोय. सध्या तो एका आधुनिक युवकाच्या रोलमध्ये दिसतोय. 


रणवीर पॅरिसमध्ये शूटिंग करतोय. रणवीरने फ्रान्सच्या राजधानीमधील एका रस्त्यावर सेल्फी पोस्ट केला आहे. त्यामुळे त्याच्या आगामी चित्रपटात तो कोणत्या लूकमध्ये दिसतो याचं आकर्षण चाहत्यांमध्ये नक्की असेल.