रवींद्र जडेजाने प्रस्थापित केला नवा विक्रम
कोलकाता : ऑलराऊंडर रवींद्र जडेजाने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात नवा रेकॉर्ड केला आहे. जडेजाने त्याच्या 129 व्या मॅचमध्ये 150 विकेट्स पूर्ण केल्या आहेत. डाव्या हाताने स्विंग गोलंदाजी करत 150 विकेट घेणारा जडेजा हा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.
कोलकातामधील भारत विरुद्ध इंग्लड यांच्यातील तिसऱ्या सामन्यात सुरुवातीलाच रवींद्र जडेजाने जेनिंग्जला आऊट केलं. त्यानंतर दुसरी विकेट देखील जडेजाने पटकावली. जेसन रॉयला त्याने चालतं केलं.
जेनिंग्जला बाद केल्यानंतर जडेजाच्या नावे हा रेकॉर्ड प्रस्थापित झाला. 6 फेब्रुवारी 2009 मध्ये श्रीलंकेविरुद्ध जडेजाने वनडेमध्ये पदार्पण केलं होतं. टेस्ट फॉरमॅटमध्ये जडेजाच्या नावे 111 विकेट्स आहेत.