चेन्नई : दाक्षिणात्य सुपरस्टार यांच्या 'कबाली' चित्रपटाने कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडत २५० कोटींहून अधिक कमाई केली आहे.  भारतासोबत चीन, मलेशिया आणि इतर देशांमध्ये प्रदर्शित करण्यात आलेल्या कबाली चित्रपटाने फक्त तामिळनाडूमध्येच 100 कोटींची कमाई केली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रजनीकांत यांचा हा चित्रपट सुपर डुपर हिट ठरला असून त्यांचे चाहते मोठ्या संख्येने हा चित्रपट पाहण्यास जात आहेत. पहिल्या आठवड्यातच २०० कोटींचा टप्पा पार केलेल्या या चित्रपटासाठी खुद्द रजनीकांत यांना केवळ ३५ कोटी रुपये मानधन देण्यात आल्याचे वृत्त आहे. 



 
रिलीज होण्याआधीच कबाली चित्रपटाची चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. सोशल मिडियावरदेखील चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु होती. 


पहिल्यांदाच सकाळी 5 वाजल्यापासून चित्रपटाचे शो सुरु करण्यात आले होते. रजनीकांत यांच्या चित्रपटांचं वेड इतकं आहे की चेन्नई, बंगळुरुमधील कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती.