`सैराट`ची आर्ची होणार ब्रॅण्ड ऍम्बेसिडर ?
सैराटमधील बहुचर्चीत परश्या आणि आर्ची या जोडीचं मुख्यमंत्र्यांनीही खास कौतुक केलं आहे.
मुंबई: सैराटमधील बहुचर्चीत परश्या आणि आर्ची या जोडीचं मुख्यमंत्र्यांनीही खास कौतुक केलं आहे. एवढचं नाही तर आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी सामाजिक न्यायखात्याची विशेष योजना येणार आहे. त्या योजनेची रिंकू राजगुरू ब्रँड ऍम्बॅसिडर होण्याची शक्यता आहे. आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांच्या मुलांना शैक्षणिक, आर्थिक लाभ देण्याची योजना विचाराधीन आहे.
याबाबत चर्चा झाली आहे, तसंच रिंकू राजगुरूला याचा प्रस्तावही देण्यात आला आहे. त्यामुळे आता रिंकूचे आई-वडील हा प्रस्ताव स्वीकारणार का याकडे लक्ष लागलं आहे.