मुंबई : सैराटची हवा अजूनही सर्वत्र सुरूच आहे. सैराटमधले झिंगाट गाणे नुसते ऐकले की सर्वांचेच पाय थिरकायला लागतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असेच काहीसे यू कॅन डान्स या शोच्या सेटवर घडले. 'यू कॅन डान्स' या शो मध्ये धकधक गर्ल माधुरी दीक्षितने झिंग झिंग झिगाटवर धमाकेदार डान्स केला. 


यात रितेश देशमुखने तर हातावर टॅट्यू काढून माधुरीला हटके सरप्राईज दिलं. तर खिलाडी अक्षयकुमारनेही झिंगाटवर जमके ताल धरला.


यासोबतच तेथे उपस्थित बॉलीवूडमधील सर्वांनीच झिंगाट गाण्यावर ताल धरला.