फोटो : रितेशनं शेअर केला चिमुकल्या राहीलचा फोटो
अभिनेता रितेश देशमुख हा एक कौटुंबिक माणूस असल्याचं अनेकदा दिसून आलंय.
मुंबई : अभिनेता रितेश देशमुख हा एक कौटुंबिक माणूस असल्याचं अनेकदा दिसून आलंय.
त्याला त्याच्या सिनेमांसाठी जितकं ओळखलं जातंय त्यापेक्षा कित्येक पटीनं जास्त चर्चा त्याच्या वैयक्तिक कुटुंबातल्या नात्यांसाठी आणि जिव्हाळ्यासाठी होते.
आपल्या आयुष्यातील सुखद क्षण आपल्या चाहत्यांशी शेअर करायलाही रितेशला खूप आवडतं. यावेळीही त्यानं आपल्या आयुष्यातला एक आनंदाचा क्षण एका फोटोद्वारे आपल्या चाहत्यांशी शेअर केलाय.
आपल्या छोट्या मुलाचा - राहीलचा पहिलाच फोटो रितेशनं सोशल वेबसाईटवर शेअर केलाय... 'हा खूप स्पेशल दिवस आहे कारण आज माझ्या आईचा वाढदिवस आहे आणि या स्पेशल दिवशी मला काहीतरी स्पेशल शेअर करायला आवडेल' असं म्हणत त्यानं राहीलचा एक क्युट फोटो शेअर केलाय.