मुंबई : बॉलिवूड कलाकार रणबीर कपूर, अनुष्का शर्मा, ऐश्वर्या राय - बच्चन आणि फवाद खान यांच्या प्रमुख भूमिका असलेला 'ए दिल है मुश्किल' हा सिनेमा बऱ्याच कारणांनी चर्चेत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उरी दहशतवादी हल्ल्यानंतर या सिनेमातील पाकिस्तानी कलाकार म्हणून फवाद खानच्या भूमिकेवर वाद निर्माण झाला होता... फवाद खानच्या चेहऱ्याऐवजी या सिनेमात सैफ अली खानचा चेहरा दिसणार असंही म्हटलं जात होतं. या वादावर मात्र आता पडदा पडलाय. 


'इंडियन एक्सप्रेस'नं दिलेल्या माहितीनुसार, 'ए दिल है मुश्किल' या सिनेमातून फवाद खानची भूमिका हटवली जाणार नाही... किंवा त्याच्या जागी सैफ अली खानचाही चेहरा दिसणार नाहीय. 


उरी हल्ल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं पाकिस्तानी कलाकारांना धमकी देत भारत सोडण्यासाठी ४८ तासांचा अल्टिमेटम दिला होता. शिवाय पाकिस्तानी कलाकारांची भूमिका असलेले सिनेमा भारतात प्रदर्शित होऊ देणार नाही, असंही म्हटलं होतं.


दिवाळीच्या मुहूर्तावर हा सिनेमा २८ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे.