मुंबई : छोटे नवाब म्हणजेच सैफ अली खान यांचे जीवन बॉलीवूडच्या कहाणीपेक्षा काही कमी नाही. लहान वयात अमृताशी लग्न, घटस्फोट त्यानंतर करीना कपूरशी लग्न. सैफच्या जीवनाशी निगडित अनेक गोष्टी घ्या जाणून


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जेव्हा अमृता सिंग बॉलीवूडमधील टॉप हिरोईनपैकी एक असताना तिची सैफशी भेट झाली. सैफचे बॉलीवूडमधील करियर तेव्हा सुरु झाले होते. जेव्हा सैफ २१ वर्षांचा होता तेव्हा त्याची भेट ३३ वर्षीय अमृता सिंहशी झाली. पहिल्या भेटीतच हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले.


दोघांनी घेतलेला लग्नाचा निर्णय हा सर्वांना आश्चर्यचकित करणारा असाच होता. मात्र प्रेमात आंधळे झालेल्या दोघांना जगाची पर्वा कुठे होती. ऑक्टोबर १९९१मध्ये सैफ आणि अमृताने लग्न केले. लग्नानंतर त्यांना दोन मुलेही झाली. मात्र त्यांच्या जीवनात असे वादळ आले की त्यामुळे दोघेही पूर्ण वेगळे झाले.


एका ट्रिपदरम्यान सैफची भेट इटलीची मॉडेल रोजाशी झाली. सैफ रोजाच्या प्रेमात पडला. त्यामुळे त्याने अमृताशी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. ज्याप्रमाणे सैफ आणि अमृता यांचे लग्न आश्चर्यचकित करणारे होते त्याचप्रमाणे त्यांचा वेगळे होण्याच्या निर्णयाने सर्व आश्चर्यचकित झाले.


अमृताशी घटस्फोट घेतल्यानंतर सैफ रोजासोबत राहायला लागला. मात्र अचानक हे नातेही तुटले. टशन या चित्रपटाच्या दरम्यान सैफचे करीनासोबत सूत जुळले. २०१२मध्ये या दोघांनी लग्न केले.