`सैराट`ची कमाई वाढता वाढेच, आता या तीन भाषेत फिल्म
नागराज मंजुळे यांच्या `सैराट` सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केलेय. कोटीच्या कोटी उड्डाने घेत ८५ कोटींचा टप्पा पार करण्याची तयारी केलेय. तर त्यापुढे एक पाऊल टाकून आता तीन प्रादेशिक भाषेत हा सिनेमा येणार आहे. तशी घोषणा आज `झी टॉकीज`ने केलेय.
मुंबई : नागराज मंजुळे यांच्या 'सैराट' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केलेय. कोटीच्या कोटी उड्डाने घेत ८५ कोटींचा टप्पा पार करण्याची तयारी केलेय. तर त्यापुढे एक पाऊल टाकून आता तीन प्रादेशिक भाषेत हा सिनेमा येणार आहे. तशी घोषणा आज 'झी टॉकीज'ने केलेय.
'सैराट' सिनेमाने कमाईत मराठी चित्रपट सृष्टीत नवा विक्रम प्रस्तापित केलाय. या सिनेमाने ८५ कोटी रुपयांची आतापर्यंत कमाई केलेय. गेल्याच आठवड्यात 'सैराट'ने ८१ कोटी कमावले होते. आता हा आकडा वाढतच आहे. हा सिनेमा ९० कोटींचा आकडा पार करण्याची शक्यता वर्तविण्यात आलेय.
कमाईत विक्रम करत असताना आता हा सिनेमा दक्षिणेकडील तीन प्रादेशिक भाषेत सिनेमा काढण्यात येणार आहे. तमीळ, मल्यालम, तेलगू या भाषेत झी टॉकीज या सिनेमाची निर्मिती करणार आहे. याचे दिग्दर्शन नागराज मंजुळेच करणार असल्याचे जाहीर करण्यात आलेय. त्यामुळे मराठी सिनेमाच्या इतिहासात प्रथमच तीन प्रादेशिक भाषेत मराठी सिनेमा दुसऱ्या भाषेत डबींग होत आहे.