हैदराबादवासीय झाले सैराट
संपूर्ण महाराष्ट्रसह देशविदेशातील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या सैराटची टीम नुकतीच हैदराबादमध्ये गेली होती. तेथे सैराट सिनेमाचा स्पेशल शो आयोजित करण्यात आला होता.
मुंबई : संपूर्ण महाराष्ट्रसह देशविदेशातील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या सैराटची टीम नुकतीच हैदराबादमध्ये गेली होती. तेथे सैराट सिनेमाचा स्पेशल शो आयोजित करण्यात आला होता.
तेलंगणातील महाराष्ट्र मित्र मंडळाने हा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी या शोसाठी नागराज मंजुळे, रिंकू राजगुरू, अरबाज शेख, तानाजी गळगुंडे ही टीम उपस्थित होती. यावेळी झिंगाट गाण्यावर हैदराबादवासीय सैराट होऊन नाचले. यावेळी आर्ची अर्थात रिंकूही प्रेक्षकांसोबत झिंगाटवर थिरकली.
यावेळी उपस्थित प्रेक्षकांनी सैराटच्या टीमशी संवादही साधली. लवकरच सैराटचा रिमेक तेलुगु भाषेत येणार आहे.