मुंबई : सैराट सिनेमात प्रदीप लंगड्या म्हणजेच तानाजी गलगुंडे स्वत:ला झोपेत परशा समजत होता, ही गंमत सैराटमधील एक दृश्य चित्रित करताना घडली.


कॉजेलमध्‍ये विद्यार्थ्‍यांच्‍या परिचयाचा जो सिन आहे, तो रात्री चित्रित केला गेला. सीनची वाट पाहून - पाहून लंगड्या म्‍हणजेच तानाजी गलगुंडेला झोप लागली होती.
 
गाढ झोपलेल्‍या तानाजीला अचानक झोपेतून उठवले गेले. हाताची घडी घालून तो उभा राहिला आणि म्‍हणाला, 'माझे नाव प्रशांत काळे', त्‍यावर एकच हशा पिकला. कारण यात तो प्रशांतचे नव्‍हे, तर प्रदीप बन्‍सोडचे पात्र साकारत होता, त्‍यामुळे हे दृश्य पुन्हा चित्रित करावं लागलं.