मुंबई: बॉलीवूडमध्ये सलमान खानची ओळख ही बॅड बॉय म्हणून होते. पण गेल्या काही दिवसांमध्ये शांत असलेला सलमान पुन्हा एकदा आपल्या जुन्या रुपामध्ये दिसला आहे. पण या सगळ्या अफवा असल्याचं पसरवलं जात आहे. सलमानला चित्रपटाचं शूटिंग वेळेवर पूर्ण करायचं आहे. त्यासाठी त्यानं सेटवर नाईट शिफ्ट करायला सुरुवात केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सलमान कधी आपल्या चित्रपटाचं शूटसाठी नाईट शिफ्ट करत नाही, पण सुलतानला सर्वोत्तम बनवण्यासाठी त्याच्याकडून हे प्रयत्न सुरु आहेत. 


रिटेकला नकार


सुलतानच्या शूटवेळी सलमानकडून दिग्दर्शक अली अब्बास जफरलाही त्रास दिला जात आहे, असं बोललं जात आहे. एका सीनचा रिटेक घ्यायला सलमाननं नकार दिल्याच्या चर्चा आहेत. 


वेळ पाळत नाही सलमान ?


सेटवर येताना सलमान वेळ पाळत नसल्याचीही तक्रार आहे. सलमान कधीही सेटवर येतो आणि कधीही जातो. 


सेटवर स्मोकिंग


सलमानच्या सुलतानची शूटिंग सध्या यशराज स्टुडिओमध्ये सुरु आहे. यशराज स्टुडिओमध्ये कोणालाही स्मोकिंग करायला परवानगी नाही, असं असलं तरी सलमान मात्र कोणाचंही ऐकत नाही. यशराज स्टुडियोमधला हा नियम शाहरुख आणि रणबीरही पाळतात, पण नियम पाळेल तो सलमान कसला.


स्वत:ची वॅनिटी स्टुडिओमध्ये केली पार्क


परवानगी नसतानाही सलमान स्वत:ची वॅनिटी व्हॅन स्टुडिओमध्ये घेऊन गेला आणि व्हॅन तिकडेच पार्क केली. 


सलमान नाराज ?


हा चित्रपट करताना सलमानला अनेक अडचणी येत असल्याचं बोललं जात आहे. सुलतानच्या दिग्दर्शकासोबतही तो काही मुद्द्यांवर असहमत असल्याच्या चर्चा आहेत. 


शूटिंग केलं कॅन्सल


काहीच दिवसांपूर्वी सलमाननं या चित्रपटाचं शूटिंग स्वत:च्याच अधिकारामध्ये रद्द केलं.


टीम झाली हैराण


सलमानच्या या अशा वागण्यामुळे चित्रपटाची टीमही हैराण झाली आहे. सलमान आपल्या मर्जीनं सेटवर येतो आणि आपल्या मर्जीनं जातो. काही वेळा तर तो शूटिंगही कॅन्सल करतो. 


सत्य का अफवा ?


तर काही जण या सगळ्या अफवा पसरवल्या जात असल्याचंही बोलल जात आहे. सलमानचा सुलतान ईदला प्रदर्शित होणार आहे.