सलमानने या 5 अभिनेत्रींसोबत पुन्हा कधीच नाही केला सिनेमा
पुन्हा काम करण्यास नकार
मुंबई : मॅन विद गोल्डन हार्ट म्हणून सलमान खानला संबोधलं जातं. सलमानसोबत अनेक अभिनेत्री काम करण्यासाठी उत्सूक असतात. सोनाक्षी सिन्हा, डेजी शाह यासारख्या अभिनेत्री सलमान खान आपलं मेंटर मानतात. सलमान खानमुळे अनेक अभिनेत्रींना बॉलिवूडमध्ये संधी मिळाली. सलमान खानने बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींसोबत स्क्रिन शेअर केलं आहे. पण अशा 5 अभिनेत्री आहेत ज्यांच्यासोबत एकदा काम केल्यानंतर पुन्हा काम करण्यास नकार दिला आहे.
1. उर्मिला मातोंडकर - जानम समझा करो :
या सिनेमात सलमान आणि उर्मिला एकसोबत दिसले होते. सिनेमामध्ये अनेक चांगले गाणे होते. पण आऊटडेटेट स्टोरीमुळे सिनेमा फ्लॉप ठरला. त्यानंतर या दोघांनी कधीच एकत्र काम नाही केलं.
2.सोनाली बेंद्रे - हम साथ साथ है :
सोनाली बेंद्रे आणि सलमान खानची जोडी या सिनेमात लोकांना आवडली होती. पण यानंतर दोघेही पुन्हा कधीच एकत्र दिसले नाहीत. या सिनेमादरम्यानच सलमान काळवीट शिकार प्रकरणात सापडला होता.
3. ट्विंकल खन्ना - जब प्यार किसी से होता है :
1998 मध्ये सुपरहिट सिनेमांमधला एक हा सिनेमा होता. प्रेक्षकांनी या जोडीला पसंती दिली. चल मेरे भाई मध्ये हे पुन्हा एकत्र आले पण यावेळेस तिची जोडी संजय दत्तसोबत दिसली होती.
4.जूही चावला - दीवाना मस्ताना :
सलमान खान आणि जूही चावलाने 4 सिनेमे एकत्र केले आहेत. अदाज अपना अपना, दीवाना मस्ताना, सलाम-ए-इश्क, एयर सो ऑफ सरदार पण ते फक्त एकाच सिनेमामध्ये कपल म्हणून दाखवण्यात आले होते.
5.अमीषा पटेल - ये है जलवा :
कहो न प्यार है, गदर एक प्रेम कथा, हमराज सारख्या सिनेमामध्ये अमीषा पटेलने काम केलं. सलमान खानसोबत तिने ये है जलवा हा सिनेमा केला. पण तिचा रोल या सिनेमात इतका महत्त्वाचा नव्हता. हा सिनेमा वडील आणि मुलावर आधारीत होता. सिनेमा फ्लॉप ठरला त्यानंतर पुन्हा यांनी कधीच एकत्र सिनेमा नाही केला.