मुंबई : रितेश देशमुखच्या लय भारी या सिनेमात दबंग खान सलमान पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसला होता. त्यानंतर सलमान आता रितेशच्या छत्रपती शिवाजी या चित्रपटात दिसण्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मीडियाशी बातचीत करताना सलमानने या चित्रपटासाठी चार ते पाच दिवस शूटिंग केल्याचे त्याने सांगितले. रितेश देशमुख याची निर्मिती करतोय तर रवी जाधव दिग्दर्शन. 


सलमानने काही दिवसांपूर्वी आपल्याल मराठी चित्रपटात काम करण्याची इच्छा असल्याचे व्यक्त केले होते. तसेच चांगल्या भूमिकेच्या प्रतीक्षेत असल्याचेही तो म्हणाला होता.